--- *संतश्रेष्ठ सद्गुरु विठ्ठलभक्त विठोबा दादामहाराज चातुर्मास्ये अनवेकर यांचे महाराष्ट्र कविवर्य आर्याकार श्री.मोंरोपंत यांनी रचलेले स्तुति काव्य* ---
निजजना अमृतें बहु तर्पिती, स्व अनवे अनवेकर
अर्पिती |
सतत पूर्ण मुकुन्दयशोरसे न वदना वद ना म्हणती असे. ॥
१॥
करिति विठ्ठलभक्त सभा मुखे, विकसिते नटुनी स्व महा
सुखें |
अहिशिरीं करि नृत्य महामना न टपतो टपतो
अवलोकना ॥२॥
अजित विठ्ठलभक्त यश:कथा करुनि दाविति
मुक्तिमहापथा |
रसिक साधु मुखांबुरुहांप्रती हंसविते सवितेचि
नराकृति ॥३॥
शुकचि विठ्ठलभक्त नव्हें मृषा नुरविती रसिकीं दुसरी
तृषा |
हरियशोरसपार रुचे असा रसिकता शिकता नुतरे
कसा ॥४॥
करिति विठ्ठलभक्त कथा बरी, सुदृढ बाळहि जीस
मनीं धरी |
वश जयासि सदा भगवान् हरी, कुतुक या तुकयापरि
भूवरी ॥५॥
सदय विठ्ठलभक्तचि तोडिती त्रिगुणजाळ, जडासहि
सोडिती |
प्रभुचियाहि सुसंकट जें मतें, उलगडील गडी दुसरा न ते ॥
६॥
न तुकया समशील, न नामया, प्रिय मिळे न कळीं
अनामया.
वरि अभंग समुल्लसनें रसीं, शुकवचें कवचें नृप तो जसीं. ॥७॥
हरिजनोक्ति समुल्लसनीं पटु वचन जें वदती न कधीं कटु |
त्यजिति सेवुनि ज्या, अघवासना | बलवती लवती
सदुपासना ॥८॥
सुख तसें सकळांसहि वाटतें असुख सर्व पळांतचि आटतें;
निरखितांचि जसें भवपारदा मुनिजना निजनायक
नारदा ॥९॥
वदति जीं वचनें परितोखदे भवतमाप्रति होतचि वोखदे
निवटिले बहु वंदुनि मागती भजन ते जन तेथचि जागती
॥१०॥
कथिति जेथ मुकुंदयश:कथा त्यजुनि विठ्ठलभक्त
भवव्यथा |
निरखितां करूणामृत वृष्टिचें अजिर ते जिरतें अघ
सृष्टिचें ॥११॥
सम सदा अमृत प्रभु वर्षतो, निवुनि सर्वहि सेवक हर्षतो |
घनचि विठठलभक्त, मयूरसा, समजला मजला, स्वकरी
तसा ॥१२॥
- सांप्रदाय दर्शन
http://m.facebook.com/shrivitthal.templeanwa
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा